Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२२ । भुसावळ शहरातील इंदिरानगर भागात घरासमोर लावलेली रीक्षा पंक्चर झाल्याचा राग आल्याने एकास धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन जैन यांनी पोलीसांत फिर्याद दाखल केली. शहरातील इंदिरानगर भागात सचिन जैन यांच्या घरासमोर संतोष झाडे यांची रीक्षा लावलेली होती. ती जैन यांनी पंक्चर केल्याच्या रागातून संतोष झाडे यांनी त्यांच्या हातातील काहीतरी धारदार वस्तूने सचिन याच्या हातावर, हनुवटीवर व मानेवर वार केला व मारहाण केली. जैन यांची आई मिनाबाई ही भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी सचिन जैन यांच्या फिर्यादीवरून संतोष झाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक यासीन पिंजारी करीत आहेत.