⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

महसुल वसुलीबाबत भुसावळ तालुका अव्वल

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । ता भुसावळ, तहसील कार्यालय महसुल वसुलीच्या बाबतीत जिल्ह्यात अव्वल. १३० टक्के वसुली झाल्याची माहिती तहसीलदार दीपक धिवरे यांनी दिली. येथील तहसील कार्यालयाला १५ कोटी ८० लाख रूपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार धिवरे यांनी मंडळाधिकारी, तलाठ्यांची बैठक घेत वारंवार सूचना करत वसुलीवर भर दिला.

या प्रसंगी तालुक्यातील नागरिकांकडे असलेली विविध करांची थकबाकी वसूल करण्यात महसूल विभागाला यश आले .
तालुक्याने २० काेटी ६९ लाख रूपये म्हणजेच १३० टक्के कर वसुली करत नवीन विक्रम प्रस्थापित केला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.