⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

भुसावळ बाजारपेठेतील पाणपोई भागवतेय सर्वांची तहान

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । भुसावळ शहरातील मुख्य बाजारपेठेतील मरिमाता मंदिर परिसरातील तेरापंथ जलसेवा पाणपोईतून दररोज चार हजार लिटर थंड व शुद्ध पाण्याचे वितरण केले जात आहे. उन्हाळ्यात जिवाची काहिली थांबवण्यासाठी थंडगार पाण्यासाठी बाजारात होणारी भटकंती या पाणपोईवर थांबते. माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांच्या माध्यमातून ही सेवा दिली जात आहे.

दररोज सात हजार लिटर पाणी

स्व.मोतीलाल लखीचंद निमाणी यांनी ४० वर्षांपूर्वी बाजारातील ग्राहक, विक्रेते, व्यापारी यांच्यासाठी तेरापंथ पाणपोई सुरु केली होती. काही वर्षे देखभाल न झाल्याने ही सेवा बंद झाली. गेल्या वर्षी उन्हाळ्यात माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी या पाणपोईत अत्याधुनिक आरओ व वॉटर कुलर सिस्टिम बसवून स्व. मोतीलाल निमाणी व स्व. सुजीत रमेशचंद्र कोठारी तेरापंथ पाणपोईचे पुनरुज्जीवन केले. सध्या पाण्याची मागणी वाढल्याने परिसरातील दुकानदार, व्यापारी, विक्रेते, ग्राहक आदींची तहान ही पाणपोई भागवते. दररोज सात हजार लिटर पाण्याची टाकी भरली जाते. यातून आरओ सिस्टिमने शुद्ध व थंड झालेले सुमारे चार हजार लिटर पाण्याचे दिवसभरात वितरण होते. या पाणपोईवर स्वतंत्रपणे कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे.