धक्कादायक : भाजीविक्री करणार्‍या तरूणाला बेदम मारहाण

सप्टेंबर 16, 2022 3:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । कारण नसताना भाजीविक्री करणार्‍या तरूणाला तीन जणांनी बेदम मारहाण केली शिवाय मांडीवर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 21T143957.224 jpg webp

चंद्रकांत साहेबराव महाजन (38, मारूती मंदीराजवळ, हरीविठ्ठल नगर, जळगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला असून भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवाीर, 14 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता रामानंद नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ चंद्रकांत महाजन हा काही कामानिमित्त आला असता तिथे निरंजन, केशव आणि निरंजनचा भाऊ (तिघांचे पुर्ण नाव माहित नाही) हे तिघे आले. त्यांनी काहीही कारण नसतांना चंद्रकांत महाजन याला बेदम मारहाण केली.

या मारहाणीत चंद्रकांतला भाजी कापण्याच्या चाकूनने मांडीवर वार करून जखमी केले. या प्रकरणी चंद्रकांत महाजन याने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवार, 14 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सुनील पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now