धक्कादायक : तरुणाने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन!

सप्टेंबर 9, 2022 1:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी येथील २९ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपविल्याची घटना काल ८ रोजी घडली. दरम्यान, पारंबी येथे शेजारी बांधकाम करण्याचा वाद विकोपाला गेल्याने सदर युवकाने स्वतः च्या हाताच्या नसा कापून विहिरीत उडी घेतल्याचा आरोप मृत तरुणाच्या वडिलांनी केला आहे.

jalgaon 2022 09 09T135109.338 jpg webp

विशाल उर्फ गोलू उखर्डा गव्हाळ (वय २९) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा तरुण दि. ८ सप्टेंबरच्या पहाटे प्रातःविधीसाठी काकोडा रस्त्याकडे गेला. त्याने शेजारीच असलेल्या बाळू त्र्यंबक दाणे यांच्या शेतातील विहिरीजवळ स्वतःच्या हाताच्या नसा कापून विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान, मयत विशालच्या मृत्यूस गावातील इसम हरीचंद्र दाणे हे जबाबदार असल्याचा आरोप मयत विशालच्या वडिलांनी केला आहे. हरीचंद्र दाणे यांच्या घराशेजारी विशाल गव्हाळ याचे बांधकाम सुरू आहे. मागील आठ दिवसांपासून दोघांमध्ये जागेवरून वाद होता. त्यामुळेच विशालने जीवनयात्रा संपवली असून त्याला संशयिताने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप उखर्डा गव्हाळ यांनी केला आहे.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून संशयित हरीचंद्र दाणे याला पोलिसांनी अटक केली आहे. मयत विशाल गव्हाळच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्याचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पो. नि. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. राहुल बोरकर, कुऱ्हा पोलीस दुरक्षेत्रचे सहाय्यक फौजदार श्रावण जवरे, पो. ना. हरीश गवळी, पो. ना. प्रदीप इंगळे, पो.कॉ. सागर सावे, राहुल नावकर, संजय लाटे, गोपीचंद सोनवणे, बिराजदार आदी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now