⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

धक्कादायक : मद्यपीने केला अत्याचार, जन्माला आलेल्या बाळाला नाल्यात फेकले!

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२२ । हल्ली अत्याचाराचे प्रमाण वाढले असून चोपडा तालुक्यात पुन्हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झोपडीत राहणाऱ्या महिलेवर एकाने मद्याच्या नशेत अत्याचार केल्याने ती महिला गर्भवती झाली, या अत्याचारातून तिने बाळाला जन्म दिला, धक्कादायक म्हणजे, बाळाच्या जन्मानंतर घाबरलेल्या पिडितेने ते बाळ नाल्यात फेकले. दरम्यान, नवजात बालकाला तातडीने चोपडा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून पिडीत महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील सनपुले येथे वास्तव्यास असलेल्या महिलेवर संशयित आरोपी कैलास गोकुळ पाटील याने नऊ महिन्यापुर्वी मद्याच्या नशेत सदर महिलेवर अत्याचार केले. या अत्याचारातून तिला दिवस गेले. यातून तिने बाळाला जन्म दिल्याने समाजात बदनामी होवू नये म्हणून घाबरुन तिने आपल्या पोटच्या बाळाला नाल्यात फेकून दिले. दरम्यान, चोपडा ग्रामीण पोलीसांनी घटनेची माहिती मिळताच पोलीस सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले, पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, नवजात बालकाला तातडीने चोपडा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पिडीत महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधम कैलास गोकुळ पाटील याला मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषिकेश हे करीत आहे.