धक्कादायक : भर बाजारातून ४ लाखांची रोकड असलेली थैली लांबवली

सप्टेंबर 30, 2022 10:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरातील एका व्यापार्‍याने कापडी बॅगमध्ये ठेवलेली चार लाख रूपयांची रोकड लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतोष हुकुमतमल राजपाल असे व्यापाऱ्यांचे नाव आहे. हा प्रकार घडला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

theft chori jpg webp

अधिक माहिती अशी कि, संतोष हुकुमतमल राजपाल (वय ४५, रा. जळगाव) हे होलसेल व्यापारी आहेत. काल रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास ते आपले बंधू खेमचंद राजपाल यांच्या अशोक टॉकीज गल्लीतील जय अंबे इलेक्ट्रीक या दुकानाच्या ठिकाणी आले होते. याप्रसंगी त्यांनी आपल्या मोपेडवरील कापडी थैलीत चार लाख रूपयांची रोकड ठेवलेली होती.

दरम्यान, दोन भामट्यांनी ही कापडाची पिशवी लंपास केली व पळून गेले. संतोष राजपाल यांनी जळगाव शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यावरून भादंवि कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या नेतृत्वाखाली निरिक्षक विजयकुमार ठाकूरवाड हे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now