जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । भुसावळ तालुक्यातील एका गावातील 36 वर्षीय महिलेचा स्नानगृहातच आरोपीने विनयभंग केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात संशयीत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
इब्राहीम भोजू गवळी (वय 36) असे संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपीने बुधवार, 24 ऑगस्ट रोजी 36 वर्षीय महिला पहाटे सहा वाजता स्नानगृहात लघू शंकेसाठी गेल्यानंतर आरोपीने महिलेशी अंगलट करीत तिचा विनयभंग केला शिवाय आरोपी इब्राहीम हा पीडीतेचा गेल्या तीन महिन्यापासून शौचास व भाजीपाला घेण्यासाठी जात असतांना पाठलाग करीत होता.
याप्रकरणी पीडीीतेच्या तक्रारीवरून इब्राहिमविरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास हवालदार गणेश राठोड करीत आहेत.