जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ शहरातील रामेश्वर नगर, प्रोफेसर कॉलनी भागातील रहिवासी २७ वर्षीय तरुणाने मंगळवारी दुपारी १:३० वाजता गळफास घेत आत्महत्या केली. पवन रमेश चौधरी (वानखेडे) (वय २७) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पवनने मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना उघडकीस येताच कुटुंबियांना धक्का बसला. या प्रकरणी तुषार विनोद चौधरी यांच्या खबरीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत पवन हा माजी नगराध्यक्ष विजय चौधरी व गोपाळ चौधरी यांचा भाचा होय. त्याने आत्महत्या का केली? हे कारण मात्र समोर आले नाही.

हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






