⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | धक्कादायक : अमळनेर तालुक्यात एकाच दिवशी झाले दोन खून

धक्कादायक : अमळनेर तालुक्यात एकाच दिवशी झाले दोन खून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २५ एप्रिल २०२३ | एकाच दिवसात अमळनेर तालुक्यात झालेल्या २ खुनांमुळे तालुका हादरला आहे. एकाच दिवसात अमळनेर तालुक्यात २ वेगवेगळ्या ठिकणी खून झाले आहेत. घडलेल्या हा घटनांमुळे फक्त अमळनेरचं नाही तर संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

खुनाची पहिली घटना म्हणजे अमळनेर शहरात स्पिकरच्या आवाज कमी करण्यावरून झालेल्या वादातून चाकूने भोसकून तरूणाचा खून करण्यात आला.यावेळी पहिल्या घटनेत अमळनेर शहरातील दाजीबानगरात कार्यक्रमात सुरू असलेला लाउडस्पीकरचा आवाज कमी करण्याच्या कारणावरून अक्षय राजू भील (वय-२१) या तरूणावर सोमवारी २४ एप्रिल रोजी रात्री पाच ते सहा जणांनी चाकू भोसकून गंभीर जखमी केले होते. त्याला धुळे येथील शासकीय रूग्णालयात उपाचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान प्राणज्योत मालविली.

तर खुनाची दुसरी घटना म्हणजे अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात दारूच्या नशेत असतांना झालेल्या वादात तरूणावर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी २४ एप्रिल रेाजी रात्री घडली. २४ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास नाना मंगलसिंग बारेला (वय-२१) या तरूणाला वयक्तिक वादातून संशयित आरोपी डेबूजी सुरसिंग बारेला (वय-२२) याने कुऱ्हाडीने वार करून नाना बारेला याचा खून केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोहेकॉ सुनील जाधव, पोकॉ राहुल पाटील यांनी सावखेडा गावातील खून प्रकरणात संशयित आरोपी डेबूजी सुरसिंग बारेला याला ताब्यात घेतले आहे

author avatar
टीम जळगाव लाईव्ह