जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । “शावैम” व रुग्णालयात उपचारासाठी आलेली १४ वर्षीय मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने डॉक्टरही भावुक झाले. या मुलीला त्रास होत असल्याने कुटुंबीयांनी तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. तपासाअंती ही मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले.

याबाबतची माहिती डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिली असता त्यांनाही धक्का बसला. अल्पवयीन मुलगी असल्याने डॉक्टरांनी जिल्हा पेठ पोलिसांना बोलावले होते. त्यांनी मुलीची चौकशी केली असता ओळखीतीलच मुलाशी झालेल्या अनैतिक संबंधातून मुलगी गर्भवती झाल्याचे समोर आले. पोलिसांनी मुलीला व तिच्या आई, वडिलांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले. मात्र तक्रार न देताच ते निघून गेले.

- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






