जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । यावल तालुक्यातील डोंगरकोठारा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी शोभा लक्ष्मण भिरूड यांची बिनविरोध निवड झाली.

येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात बैठक होऊन शोभा भिरूड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड निश्चित करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज भारंबे व विकास सोसायटीचे सचिव विजय सिंग पाटील यांनी कामकाज पाहिले. सदस्य कल्पना राणे, अमोल भिरूड, पद्माकर भिरूड, किरण भिरूड, कृष्णा झांबरे, दुर्गा प्रसाद महाजन, जगन्नाथ राणे, लुकमान तडवी, विलास राणे, धर्मा बाऊस्कर, सुनील झांबरे, यदुनाथ पाटील व कर्मचारी हजर होते.

हे देखील वाचा :








