Breaking : शिवसेनेला पुन्हा झटका, ‘हा’ मंत्री सकाळपासून नॉट रिचेबल

जून 26, 2022 3:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ । शिंदे गटाच्या बंडखोरीने शिवसेना हादरली असून बंड केलेल्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून पावले उचलली जात. मात्र दुसरीकडे शिवसेनेला पुन्हा झटका बसला आहे. तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बंडात आता राज्यातील आणखी एक मंत्री गेला असण्याची शक्यता आहे. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. कालच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला ते उपस्थित होते, मात्र त्यानंतर आज सकाळपासून त्यांचा संपर्क झालेला नाही.

udhav thakre jpg webp

बंड केलेल्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून पावले उचलली जात आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेतून होणारी आमदारांची गळती थांबण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. एकनाथ शिंदे गटात शिवसेनेचे जवळपास 40 आमदार आणि इतर अपक्षांसह जवळपास 50 आमदारांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सध्या गुवाहाटीमध्ये थांबले आहेत.

आता या फुटीर आमदारांच्या यादीत उदय सामंत यांचेही नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. उदय सामंत हे रत्नागिरीचे आमदार आहेत. उदय सामंतही त्यांना जाऊन मिळाल्यास बंडखोरांचे बळ आणखी वाढण्याची शक्यता आहे. उदय सामंत हे गुवाहाटीसाठी रवाना झाल्याचे सांगण्यात येते आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now