जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । खेडगाव नंदीचे तालुका पाचोरा येथील ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक १ मधील एका जागेसाठी तिरंगी लढतीत शिवसेनेचे पंढरीनाथ पाटील यांनी बाजी मारत एकतर्फी विजयी झाले उपसरपंच पदावर असलेले भटेसिंग पाटील यांनी त्यांना सरकारी नोकरी लागल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्या रिक्त झालेल्या जागेसाठी तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
५जून रोजी झालेल्या शांततेत मतदान झाल्यानंतर ६ जून रोजी पाचोरा तहसील येथे मतमोजणी करण्यात आली या मतमोजनीत एकूण मतदान ७४६ पैकी ४५३मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये पुरुष मतदार २५३ तर स्त्री मतदार २०० असे मतदान झाले .पैकी विजयी झालेले शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी सभापती असलेले पंढरीनाथ गोविंदा पाटील यांना ३४९ मते मिळाली रवींद्र कडुबा कोळी ८१ मध्ये अजय अभिमन पाटील ११ मते तर नोटाला १२ मते मिळाले सेनेचे पंढरीनाथ पाटील विजय झाल्याने पाचोरा भडगाव चे आमदार किशोर पाटील , मुकुंद बिल्दीकर , जिल्हा परिषद गटाचे सदस्य रावसाहेब पाटील , पदमसिंग पाटील ,शिवसेना तालुका प्रमुख शरद पाटील , शिवदास पाटील , दिपक सिंग राजपूत,राजेंद्र साळूंके , स्वीय सहाय्यक राजेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले तहसीलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी महेंद्र सुखदेव पाटील यांनी कामकाज पाहिले.