जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवल्याने एरंडोल- पारोळा विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सोमवारी दुपारी १२.०० वा. शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून धरणगाव हायवे चौफुली पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. त्या ठिकाणी जवळपास १५ ते २० मिनिटे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला व धरणगाव जामनेर मार्गा वर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. निषेध मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. ५० खोके एकदम ओके, ” गद्दारांनी चिन्ह गोठवले खुद्दरांचे रक्त पेटले ” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल माने, जि.प.चे माजी सदस्य नानाभाऊ महाजन, समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष रमेश महाजन, शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांनी केले.
माजी आमदार सतीश पाटील हे जळगावला जात असताना त्यांनी आंदोलन स्थळी थांबून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. या आंदोलनात विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, पारोळा तालुका प्रमुख प्राध्यापक आर. बी. पाटील पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप रोकडे, महिला आघाडी प्रमुख महानंदाताई पाटील, माजी उपनगराध्यक्ष आरतीताई महाजन, उप तालुकाप्रमुख संजय पाटील, मोहन सोनवणे, शहर प्रमुख कुणाल महाजन, पारोळा शहर प्रमुख अशोक मराठे, माजी नगरसेवक प्रमुख महाजन नितीन बिर्ला, दशरथ चौधरी, सुनील चौधरी, परेश बिर्ला, संजय महाजन, रमेश माळी, राजेंद्र महाजन, कलीम शेख, गोपाळ महाजन, अमोल भावसार, कुणाल पाटील, आरिफ मिस्त्री, सुनील मराठे, अनिल महाजन, राजेंद्र ठाकूर, रवी पाटील, सनी लोहार, पंकज चौधरी, मोहन महाजन, देशमुख, राठोड, युवराज महाजन, गोविंदा बिर्ला, जयेश माळी, सिद्धार्थ परदेशी, रवींद्र महाजन, राजेश महाजन, देवेन पाटील, अतुल मराठे, गोविंदा राठोड, नवाल भाई आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी आपल्या सहकार्या समवेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.