जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२५ । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. कारण जळगाव तालुक्यातील रायपूर येथील अनेक कार्यकर्त्यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.

यांचा झाला पक्षप्रवेश
या प्रवेशासाठी विधानसभा क्षेत्रप्रमुख शाम भाऊ कोगटा, अतुल घुगे व प्रवीण परदेशी यांनी विशेष प्रयत्न केले.या प्रसंगी रायपूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य मनोज परदेशी, माजी सरपंच मधुकर धनगर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे कार्यकर्ते शुभम परदेशी, उज्वल सोळंके, सागर परदेशी, सुनील परदेशी, कृष्णा शिंदे, बापू सकट, पंकज शिंदे, निखिल सावळे, महेश कोळी यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश घेतला.

तसेच शिवसेना (उबाठा गट) चे कार्यकर्ते विशाल सैंदाणे, विशाल सावंत, पवन धनगर, दिलीप धनगर, शुभम धनगर, राजेश धनगर, धीरज सोळवे, दिलीप परदेशी, अनिल परदेशी, प्रेमसिंग ठाकूर यांनी देखील पक्षात प्रवेश केला.
कार्यकर्त्यांनी सांगितले की, “गुलाबराव पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर आणि जनतेसाठी सातत्याने कार्य करण्याच्या भूमिकेवर आमचा पूर्ण विश्वास आहे.” या प्रवेशानंतर रायपूर परिसरात शिवसेना (शिंदे गट) ची ताकद अधिक भक्कम झाली असून स्थानिक पातळीवर नवचैतन्य निर्माण झाले आहे.








