शरद पवार मुख्यमंत्री बनण्यावेळी शिवसेना फुटली, हा तर कुटील कट
जळगाव लाईव्ह न्युज । १९ ऑक्टोबर २०२२ । शरद पवार मुख्यमंत्री बनायची वेळ आली, तेव्हा शिवसेना फुटली, हा कुटील कट असल्याचा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला आहे. यावेळी अभिजीत बिचुकले म्हणाले कि, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना संपूर्ण नेस्तनाबूत करण्यासाठी झालेला हा कुटील कट आहे. जेव्हा त्यांचा मुख्यमंत्री बनायची वेळ आली, त्याच वेळी शिवसेना फुटली. शिवसेना नवरा, भाजप बायको, अतिशय सुंदर संसार चालला होता दोघांचा. त्या दोघांनी बहुतेक एक नाट्य केलेले आहे
तर दुसरीकडे ते असेही म्हणाले कि, अडीच वर्षांनी जर शिवसेना फुटत असेल, तर मास्टरमाईंड कोण तरी आहे, मला माहिती नाही. गेले तीन चार महिने एकमेकांवर यथेच्छ आरोप-प्रत्यारोप करणारे जर अर्ज माघार घेत असतील, तर आता महाराष्ट्रात अभिजीत बिचुकलेचाच प्रत्येक आमदार आणि खासदार झाला पाहिजे,
सध्या राज्यात सुरु असलेले राजकारण हे जनतेच्या हिताचे नाही तर कोण मोठा यावरुनच सुरु आहे, असे अभिजित बिचुकले यांनी म्हटले होते. शिवसेना आणि शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोप हे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आहेत. शिवसेना आणि शिंदे गटाला राजकीय स्वार्थ साधायचा आहे, असाही आरोप अभिजीत बिचुकले यांनी केला काही दिवसांपूर्वी केला होता.