⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | नेरी विकासोत शिवसेनेला धक्का..भाजपाचा..;

नेरी विकासोत शिवसेनेला धक्का..भाजपाचा..;

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । नगरदेवळा येथील विकासोच्या पाठोपाठ, नेरी ता.पाचोरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा प्रणित युवा शक्ती पॅनलने शिवसेनेचा सुपडा साफ करत सर्वच्या सर्व १३ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

सर्वसाधारण मतदारसंघातून : पाटील अशोक शिवराम, पाटील रवींद्र पुंडलिक, पाटील साहेबराव झावरु, पाटील अशोक धर्मराज, सूर्यवंशी विजय रामराव, पाटील अंकुश यादव, बोरसे किशोर लालचंद, पठान बशीरखा दलशेरखा. महिला राखीव मतदार संघातून : सिमाबाई विलास पाटील, निर्मलाबाई मधुकर पाटील. इतर मागासवर्गीय मतदारसंघातून : ज्ञानेश्वरा विलास पाटील. अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून : अहिरे सोमा दगा. विमुक्त जाती/भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून : गढरी धर्मा राघो.

नेरी विकासोच्या विजयासाठी गावांतील तरुण, जेष्ठ नागरिक, महिला व सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली असून हा विजय संपूर्ण गावाचा आहे.तसेच येणाऱ्या काळांत विकासोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कश्या पद्धतीने विविध सेवा सुविधा देत येतील यासाठी आम्ही कटीबद्ध राहू असे निवडुन आलेल्या सर्व नवनिर्वाचित संचालकांनी सांगितले. तसेच विविध कार्यकारी सोसायटी च्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी नगरदेवळा- बाळत गट ताब्यात घेण्यासाठी एका प्रकारे मोर्चे बांधणी सुरू असुन या गटातील जिल्हा परिषद निवडणुकीत नगरदेवळा,बाळद,नेरी यासारख्या मोठ्या गावांचे मताधिक्य निर्णायक ठरत असते.त्यामुळे भारतीय जनता पार्टीने ही सर्व गावे जी एकेकाळी शिवसेनेचे बालेकिल्ले म्ह्णून ओळखली जात होती, तीच गावे सर करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रमाणात यश ह्या गटांत मिळु शकते अशी चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह