---Advertisement---
बोदवड राजकारण

बोदवडमध्ये शिवसेनेला दणका ! अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । बोदवडमध्ये (Bodwad) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) शिवसेनेला (Shiv Sena) दणका दिला आहे. कारण बोदवड तालुक्यातील आमदगाव (Amadgaon) येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

Amadgaon Shiv Sena office bearers join NCP

यांचा झाला प्रवेश
शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये वैभव तिडके, उमेश खोंड, अमोल कोळी, विशाल तिडके,श्रीकृष्ण खोंड, ललित गावंडे, अर्जुन तोरे, आकाश गावंडे, विशाल तोरे, पवन कोळी, संभाजी खोंड,युवराज तिडके, हर्षल तिडके, सागर लोहार, तेजस तिडके यांचा समावेश होता.

---Advertisement---

यावेळी बोलतांना एकनाथराव खडसे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक पक्ष असून जात पात न मानता सर्व जाती धर्माला समान संधी देणारा व विकासाचे राजकारण करणारा पक्ष आहे. तुम्हा सगळ्यांचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. आमदगावच्या विकासासाठी नेहमी निधी दिला असून भविष्यात सुद्धा विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर,जिल्हा दूध संघ संचालक मधुकर राणे, हेमराज चौधरी, अनिल वराडे, सुभाष पाटील, संदिप देशमुख,योगेश कोलते, संजय रल, यु.डी.पाटील सर, पवन राजे पाटील, रवींद्र दांडगे, संदिप जावळे, सरपंच संभाजी पारधी, उपसरपंच मिलिंद गुरचळ,विष्णू किनगे,हेमराज पाटील, कडू पाटील, मनोज बोरले, चंद्रकांत पाटील, प्रसाद खोंड, अमर पारधी, आकाश किनगे,नयन आखरे उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---