बांबरुड-कुरंगी विकासोत भाजपाची बाजी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ । पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा-बाळद गटा पाठोपाठ आता भाजपाने आपला मोर्चा बांबरुड-कुरंगी गटात वळवला असुन येथे देखील एक-एक विविध कार्यकारी सोसायट्या सर करण्यास भारतीय जनता पार्टीने सुरुवात केल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या वेरुळी खु.-वडगांव टेक आणि आसनखेडा खु.सोसायटी मध्ये भाजपाने एक हाती सत्ता मिळवत शिवसेना व राष्ट्रवादीच्या बाले किल्लाला सुरुंग लावला आहे.

jalgaon 10

वेरुळी खु.-वडगांव टेक येथे शिवसेना प्रणित सहकार पॅनल विरुद्ध भाजपाच्या शेतकरी विकास पॅनल मध्ये यावेळी जोरदार लढत झाली. प्रत्यक्ष ११ जागांसाठी झालेल्या या चुरशीच्या निवडणूकीत भाजपा प्रणित शेतकरी विकास पॅनलने १० जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. वेरुळी-वडगांव टेक या वि.का.सोसायटीच्या विजयासाठी पॅनल प्रमुख योगीराज पाटील अनिल पाटील हंसराज पाटील यांच्यासह गोपाल देसले, अमोल पाटील, सचिन सोनवणे, सचिन पाटील, राजेंद्र देसले, संदीप रणदिवे, श्रीराम रणदिवे, नितीन रणदिवे, देविदास महाजन व गावांतील इतर तरुण, जेष्ठ नागरिक, महिला व सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली. आसनखेडा खु. वि.का.सोसायटीच्या विजयासाठी पॅनल प्रमुख आबा पाटील यांच्यासह शिवाजी पाटील, सुरेश पाटील, प्रल्हाद पाटील, देविदास पाटील,पांडुरंग पाटील तसेच गावांतील तरुण, जेष्ठ नागरिक,महिला व सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली.

दरम्यान, वेरुळी खु.-वडगांव टेक आणि आसनखेडा खु.येथील नवनिर्वाचित विकास संचालकांशी संवाद साधला असता हा विजय संपूर्ण गावाचा विजय आहे.तसेच येणाऱ्या काळांत वि.का.सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कश्या पद्धतीने विविध सेवा सुविधा देत येतील यासाठी आम्ही कटीबद्ध राहू असे त्यांनी सांगितले.

   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now