शिवसेना आ.किशोर पाटलांची जीभ घसरली, किरीट सोमय्यांना म्हणाले…

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । भाजपचे नेते किरीट सोमय्या गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड चर्चेत आणि महाविकास आघाडीच्या टार्गेटवर आहेत. काही दिवसापासून माजी खा.संजय राऊत आणि किरीट सोमय्या असे शाब्दिक युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमय्या सारख्या लोकांना उत्तर देण्याची गरज नाही. असे आ. सांगत आ.किशोर पाटील यांची किरीट सोमय्यावर बोलताना जीभ घसरली आहे. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने आयोजित सभेत आ.किशोर पाटील यांनी भाजप सरकारवर मोठी टीका केली आहे. यावेळी ‘बोबड्याला उठवायचं आणि टीव्हीवर पाठवायचं, हेच भाजपचे धंधे असल्याचे म्हणत आ. किशोर पाटील यांनी नाव न घेता किरीट सोमय्यांवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दि.२६ पासून राज्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरु आहेत. त्यानुषंगाने पाचोरा येथे दि.२९ रोजी शिवसंपर्क अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना आ. किशोर पाटील यांची किरीट सोमय्या यांच्याविषयी बोलताना जीभ घसरली. अडीच वर्षापर्यंत हे सरकार यांच्या बापाकडून पडू शकले नाही, मग ईडी लावा, सीबीआय लावा, नाहीच काय तर तर ते नारळ लावा आणि नाही काही तर सकाळी उठून त्या बॊबड्याला पाठवा हेच भाजपचे धंदे असल्याचे आ.पाटील म्हणाले. आ.पाटील यांनी भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपच्या किरीट सोमय्यासारख्या व्यक्तींना उत्तर देण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.

किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारच्या मागे हात धुवून लागले असून केव्हा, कुणाच्या मागे ईडी लागणार याची माहिती बऱ्याचवेळा त्यांनी अगोदरच माध्यमांना दिली आहे. किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे संजय राऊत यांच्यात मोठा शाब्दिक वाद सुरु आहे. काल आ.किशोर महाजन यांनी केलेल्या टिकेला अनुसरूनच सामना दैनिकात एका मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते. किरीट सोमय्यांवर केलेल्या टीकेनंतर ते याकडे कसे बघतात आणि किशोर पाटलांना काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.