⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | ..म्हणून खोटे गुन्हे दाखल केले, चंद्रकांत पाटलांचा पुन्हा खडसेंवर गंभीर आरोप

..म्हणून खोटे गुन्हे दाखल केले, चंद्रकांत पाटलांचा पुन्हा खडसेंवर गंभीर आरोप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू असतानाही राज्यातील सरकारमध्ये मित्र पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 17 पैकी चार जागांसाठी आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीपासून शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना दूर ठेवण्यासाठीच त्यांच्यावर खोटे आरोप करून गुन्हे दाखल करण्यात आल्याचा घणाघाती आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आज मंगळवारी माध्यमांशी बोलतांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव न घेता चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर मात्र मतभेद आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मागील महिन्यात खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर झोलेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणीच खडसेंचे नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी धक्कादायक आरोप केले आहेत.

दरम्यान, बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 17 पैकी चार जागांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसेंवर धक्कादायक आरोप केलाय. ‘बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीपासून स्थानिक प्रमुख कार्यकर्ते बाजूला रहावेत, म्हणून खोटेनाटे आरोप करून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या साऱ्या प्रकरणासंदर्भात आपण राज्य शासनाकडे बाजू मांडली आहे. तसेच पोलीस प्रशासनाला पुरावे दिले आहेत. या सार्‍या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. त्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

एकनाथ खडसे यांना लक्ष्य करताना आमदार चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, तुम्ही सत्तेत आहात म्हणून अशा प्रकारे द्वेषाचे राजकारण करणं चुकीचं आहे. ज्यावेळी सारा प्रकार घडला तेव्हा; ज्यांच्यावर आरोप झाले आहेत ते शिवसेनेचे पदाधिकारी कुठे होते? याचे पुरावे आपण पोलिसांना दिले आहेत. त्याचा तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.