आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव घसरला; आता 24 कॅरेटचा दर काय?
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२४ । सध्या देशभरात लग्नाचा सिझन सुरु असून सोने दरात चढ उतार सुरु आहे. दरम्यान सोन्याची खरेदी (Gold) करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. देशातील सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकी सोन्याच्या दरात किती घसरण झाली? याबाबतची माहिती पाहुयात.
MCX वर आज सोन्याचा भाव किती?
आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरात वाढ दिसून आली आहे. दरात 164 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीसह MCX वर सोने 75815 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. तर चांदीच्या किमतीवर नजर टाकली तर 113 रुपयांची वाढ दिसून येत असून ती 87300 रुपये प्रति किलो या भावाने विकली जात आहे.
जळगावात 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर
२२ कॅरेट १० ग्रॅम सोनं आज ७०,३०० रुपयांपर्यंत आले आहे.
२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ७७,४०० रुपये इतका आहे.