पथनाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा संदेश ; शिवजयंती जल्लोषात
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२६ । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाने जणू शिवशाही अवतरल्याची अनुभूती झाली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून विविध विषयांवर जनजागृती करीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील स्वराज्याचा संदेश पोहचवत शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वराज्य बॅचतर्फे शिवपर्व-2026 चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करण्यात आली. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. माया आर्विकर, प्रा. डॉ. बापूराव बिटे, डॉ. विजय बाविस्कर, आशिष भिरूड, गोपाळ भोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मिरवणुकीत छत्रपती शिवरायांचा सजीव देखावा
शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. तसेच वारकरी संप्रदायाची प्रथा जपणारा देखावाही सहभागी होता. छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा निसर्ग भैराम यांनी साकारली होती. तसेच विठ्ठलाची वेशभूषा निरज वाठोरे व रूख्मीणीची वेशभूषा आरती बेले या विद्यार्थीनीने साकारली. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने उत्साह संचारला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करण्यात आला. जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणला होता.
पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात प्रजा अत्यंत सुखी होती. मात्र सध्याच्या काळातील स्त्री अत्याचार, व्यसनाधीन पिढी, आई-वडीलांना वृध्दाश्रम दाखविणे, शेतकर्याच्या कष्टाचे मोल याविषयीचा संदेश देणारे पथनाट्य एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. या पथनाट्यात पियूष बिसेन, सुदेश शिंदे, पुष्कर लोंढे, मिहीर पाटील, कृणाल छोले, सिध्देश वंजारी, पार्थ वैद्य, वेदांत वानवे, अमितेश मडसे, शिलान नगराळे, ऐश्वर्या रत्नपारखी, निशीका मंडोरे, संजीवनी जाधव, आकांक्षा पवार, विश्रृता चव्हाण, आयुषी बकाने यांनी सहभाग घेतला. या पथनाट्याचे उपस्थितांनी कौतुक केले.
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

जळगाव – येथील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील व हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन केले. याप्रसंगी डीन डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उमाकांत चौधरी, डॉ. सौगदकुमार तायडे, डॉ. प्रशांत मोरे, डॉ. रूपाली चौधरी, डॉ. चेतनकुमार पाटील, डॉ. मुकेश चौधरी, डॉ. साजीया खान, रजीस्ट्रार चेतन चौधरी, मोहीत येवले उपस्थित होते. त्यानंतर महाविद्यालय परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा महेश मछले याने साकारली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर नाटिका सादर करण्यात आली. तसेच नृत्यदेखील सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन सौरभ मराठे, वेदांत चव्हाण, नेहल चौधरी यांनी केले. तर परिणीता पेठे व चेतना शिंदे यांनी नृत्य सादर केले. तर नाटीका आशिष तायडे, श्रृती उमाळे, रिध्दी जैस्वाल यांनी केले. सूत्रसंचालन कौस्तुभ वडगावकर, रांजली इंगळे यांनी केले.
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

जळगाव: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालय येथे उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रम महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर व प्रशासकी अधिकारी राहुल गिरी तसेच अध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या घोषणांनी भारावून गेले होते. प्रथम वर्षाचा विद्यार्थी सुमित काकडे याने सादर केलेला जोशपूर्ण पोवाडा सादर केला. पवाड्यातून शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे प्रभावी वर्णन करण्यात आले. त्यानंतर प्रथम वर्षाचा विद्यार्थी भूषण नामदेव याने दिलेल्या दमदार घोषणांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. हा कार्यक्रम विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी आणि डॉ. अमित जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांवर प्रकाश टाकण्यात आला व विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.








