मेळाव्यात शिंदे देणार ठाकरेंना धक्का : ५ आमदार २ खासदार येणार शिंदे गटात
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेनेच्या ठाकरे गटातील ५ आमदार आणि २ खासदार हे शिंदे गटात जाणार आहेत. यामुळे दसऱ्या मेळाव्यात शिवसेनेच्या शिंदे गटात अजून फूट पडणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. सर्वच पक्षातील लोक शिंदे गटात सामील होत आहेत. मात्र आता शिंदे गट उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का देणार असून उद्धव ठाकरे गटातील २ खासदार व ५ आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. शिवसेनेमध्ये उरलेल्या आमदारांपैकी ५ आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून २ खासदार लवकरच शिंदे गटामध्ये सामील होणार असल्याचा दावाशिंदे गटाने केला आहे.
शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार आमच्यासोबत आहेत. आता दोन खासदार, पाच आमदारांचा बीकेसीच्या मैदानावर प्रवेश झालेला दिसेल. शिंदेसोबत आहे तीच खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे. शिवसेनेला सदैव शिव्या देणाऱ्यासोबत आम्ही गेलेलो नाही, या शब्दांत निशाणा साधत, राज्यात खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची युती झाली आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याला गतिमान सरकार मिळाले आहे, असे कृपाल तुमाने म्हणाले.