आम्ही रक्त पिणारे ढेकूण नसून रक्त देणारे शिवसैनिक आहोत – मंत्री. गुलाबराव पाटील


जळगाव लाईव्ह न्यूज | २४ एप्रिल २०२३ |  आम्ही रक्त पिणारे ढेकूण नसून रक्त देणारे शिवसैनिक आहोत असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण 3५ वर्षे राहिलो आहे, त्यांचे शब्दप्रयोग आपल्याला माहिती आहेत, त्यामुळे आम्ही रक्त पिणारे ढेकूण नसून रक्त देणारे शिवसैनिक असल्याचे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पाचोरा येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले बाळासाहेब हे उद्धव ठाकरे यांचे वडील जरूर आहेत पण ते महापुरुष आहेत.

त्याचा फोटो किंवा नाव वापरणे सगळ्यांचा अधिकार आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांचे नाव वापरू नका. हे अनेक वेळेस बोलले गेले आहे. अश्यावेळी त्या गोष्टीला किती महत्त्व द्यावे? हे मला तरी वाटतं चुकीचं होईल. असे ,मंत्री. पाटील म्हणाले

जळगाव महानगर, ममुराबाद, नशिराबाद व मेहरुण परिसरातील मुस्लीम व इतर युवक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शेख इकबाल शेख सलीम यांची जळगाव महानगरच्या उपशहर प्रमुखपदी निवड होऊन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. सूत्रसंचालन व प्रास्ताविक नगरसेवक मनोज चौधरी यांनी केले तर आभार विधानसभा क्षेत्र प्रमुख श्याम कोगटा यांनी मानले.