Thursday, August 18, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

Rain Update : नाशिकच्या पावसाने गिरणेला येणार पूर, उत्तर महाराष्ट्रात ‘हाय अलर्ट’

चिन्मय जगतापbyचिन्मय जगताप
July 11, 2022 | 8:26 pm
photo credit by Divya Marathi

photo credit by Divya Marathi

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । राज्यात गेल्या अनेक दिवसापासून पाऊस सुरुच आहे. काही ठिकाणी अक्षरश:पावसाने थैमान घातले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतेय. दरम्यान, राज्यात आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. नाशिकच्या पावसाने गिरणेला येणार पूर असे सांगण्यात आल्याने उत्तर महाराष्ट्रात ‘हाय अलर्ट’ जरी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात हंगामातील दुसरे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मोसमी वाऱ्यांचा जोर कायम आहे. दुसरीकडे पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य भारतावरून जाणारा पश्चिम- पूर्व कमी दाबाचा पट्टा (मान्सून ट्रफ) त्याच्या सर्वसाधारण स्थानापेक्षा दक्षिणेला आहे. या स्थितीच्या प्रभावामुळे राज्यात पुढील पाच दिवस सक्रिय मान्सूनची स्थिती राहील, असे ‘आयएमडी’ने हवामान अंदाजात म्हटले आहे.

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे,नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, अहमदनगर,सांगली,मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे,नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, अहमदनगर,सांगली,मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणातील पालघर, रायगड रत्नागिरीत अतीवृष्टीचा इशार देण्यात आला आहे. यासह पुणे आणि साताऱ्यात अती मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान केंद्राने 13 जुलै पर्यंत हा अलर्ट जारी केला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांतून मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर सांगली, सोलापूर जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

मुंबईत थोड्या थोड्या विश्रांतीने पावसाच्या सरी बरसत आहेत. येत्या 24 तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने याबाबत अलर्ट जारी केला आहे. तसेच या काळात हायटाईड येण्याची शक्यता असल्याने चौपाटी किंवा समुद्रकिनारी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत शनिवारी हाय टाईड येण्याची शक्यता असल्याने समुद्रकिनारी आणि चौपाट्यांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या काळात 3.6 मीटरच्या म्हणजे सुमारे 11 फूटांच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पालघर, रायगड, पुण्यातील काही जिल्हे, रत्नागिरी, कोल्हापूर आणि या जिल्ह्यांमधून सलग पाच दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणसह मुंबईमध्ये सलग पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून कळवण्यात आले आहे. पुढील पाच दिवस पाऊस जोरदार कोसळणार असल्याने नदीकडील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तर धुळे,नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, अहमदनगर,सांगली,मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव, अहमदनगरसह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Follow Us

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

in कृषी, महाराष्ट्र
SendShareTweet
चिन्मय जगताप

चिन्मय जगताप

पत्रकारिता क्षेत्रात गत ३ वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरात रिऍलिटी चेकचा विशेष अनुभव. मनपा, राजकारण क्षेत्रातील वृत्त संकलन. लाईव्ह, स्टुडिओत अँकरिंग. विशेष मुलाखतींची हाताळणी. विशेष वृत्त लेखन तसेच वृत्त संपादन.

sushilnagar-munot-advt
Copy
Next Post
indian currency

कर्ज घेण्याचा विचार करताय? 'या' सरकारी बँकेने दिली मोठी भेट, ग्राहकांना मिळणार मोठा फायदा

wari

मातृप्रेम : आईचा १००वा वाढदिवस या पठ्याने असा केला साजरा

income tax return

मृत्यूनंतरही आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक! जाणून घ्या नियम आणि पद्धत

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group