⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

शिंदे गटाचा धडाका सुरूच : शेकडो कार्यकर्ते आले शिंदेंसोबत

जळगाव लाईव्ह न्यूज : ३ एप्रिल २०२३ : जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थिती शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते गळ्यात शिवसेनेचा मफलर टाकून तरुणांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे मंत्री गुलाबराव पाटील यांचे एकूण १२ कोटी रुपयांची विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमीपूजन सोहळा पार पडला. यात गावासाठी महत्वाची म्हणजे ८ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा समोवश आहे. तसेच या कार्यक्रमात पीकांचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यापासून पिकांचे संरक्षण करावे, म्हणून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात ३० झटका मशीनचेही वाटप करण्यात आले.

यावेळी गावातील शेकडो तरुणांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, युवासेनेचे शिवराज पाटील, शिरसोली येथील ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण काटोले यांची उपस्थिती होती. ग्रामपंचायत रामकृष्ण काटोले यांच्यासह ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य असा पुष्पहार घालून मंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.