राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय, थकलेला पगार..

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२३ । गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक तुटवट्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत होत नाही. ते ७ ते १० या तारखेपर्यंत पगार देण्याची हमी राज्य शासनाने संपाच्या दरम्यान न्यायालयात दिली होती. मात्र अजूनही वेतन वेळेत होत नाही, त्यामुळे कर्मचारी त्रस्त आहेत. अशातच ऐन सणासुदीच्या तोंडावर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगाराबद्दल राज्य सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने तातडीने 300 कोटी वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे आजच सर्व कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे.एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला 7 तारखेला वेतन होत असते. मात्र अजूनही वेतन वेळेत होत नाही, त्यामुळे कर्मचारी त्रस्त आहेत.

वेतनाला महिन्याला ३६० कोटी रुपये लागतात. शिंदे सरकार फक्त महिन्याला १०० कोटी देत आहे. त्यामुळे कोर्टात सांगितल्याप्रमाणे सरकार वागत नसल्यामुळे, या संदर्भात वकिलांचा सल्ला घेऊन अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस यांनी घेतला होता.

नोव्हेंबर महिन्यातला थकीत वेतन देण्यात यावा अशी मागणी केली जात होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्याची तातडीने सरकारने दखल घेतली. त्यानंतर 300 कोटींचा निधी रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम आजच महामंडळाला देण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होणार आहे.