जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । यावल शहरातील विरार नगरात चोरट्यांनी बंद घर फोडून १५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

विरार नगरातील रहिवासी तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पुष्पा विजय अहिरराव या ९ फेब्रुवारीपासून घराला कुलूप लावून मध्य प्रदेशातील इंदूर येथे नातवाइकांकडे लग्नाला गेल्या होत्या. दहा दिवसांनी शनिवारी ‘त्या’ घरी परतल्या. यावेळी सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. त्यांनी कपाटात ठेवलेले १५ हजार रूपये शोधले असता ते मिळून आले नाही. याबाबत यावल पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल झाला. तपास उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करत आहे.

- जळगावात घरफोडीचा गुन्हा उघड ! दोन अट्टल चोरटे जेरबंद; ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
- जळगावातील महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, चौघे गंभीर जखमी
- जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर पोलिसांची मोठी कारवाई; ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, २१ जणांवर गुन्हे दाखल
- कर्जबाजारीपणा अन् नैराश्यातून अमळनेरातील तरुण शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- अट्टल मोटारसायकल चोर पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात ; चार दुचाकी हस्तगत








