⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर येथे 3 ऑक्टोबरपासून शारदीय व्याख्यानमाला

अमळनेर येथे 3 ऑक्टोबरपासून शारदीय व्याख्यानमाला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२४ । मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर, प्रा.आप्पासाहेब र.का.केले. सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेरतर्फे दि 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार स्मिता उदय वाघ यांच्या हस्ते शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल. पहिल्या दिवशी दि. 3.ऑक्टोबर रोजी .उदय निरगुडकर, मुंबई यांचे भारत काल आज आणि उद्या या विषयावर पाहिले पुष्प गुंफले जाईल. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. डिगंबर महाले सर असतील.दि. 4.ऑक्टोबर रोजी ॲड. आशिषजी जाधवर, छ.संभाजी नगर यांचे भारतीय संविधान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर ते दुसरे पुष्प गुंफतील.

मा.ॲड.श्री.श्रावण एस.ब्रह्मे व श्री.विलास दयाराम शिंदे प्रमुख अतिथी असतील. दि. 5 ऑक्टोबर रोजी शाहीर शिवाजीराव पाटील, नवरदेवळा यांचे रंग शाहिरी कलेचा या विषयावर ते तिसरे पुष्प गुंफतील. प्राचार्य के.डी.पाटील व डॉ.शरद दयाराम शिंदे प्रमुख अतिथी असतील.दि. 6 ऑक्टोबर रोजी प्रा. डॉ.संजय कळमकर, अहिल्यानगर यांचे जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर ते चौथे पुष्प गुंफतील.डॉ.संदिप जोशी व डॉ.मयुरी जोशी प्रमुख अतिथी असतील.दि. 7.ऑक्टोबर रोजी समारोप.समारोपाच्या वेळी कवी प्रा.श्री प्रवीण दवणे,ठाणे यांचे दीपस्तंभ मनातले जनातले या विषयावर ते पाचवे पुष्प गुंफतील डॉ.अनिल शिंदे प्रमुख अतिथी असतील.

अमळनेरकरांसह रसिकांसाठी पर्वणी असणारी शारदीय व्याख्यानमाला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे दररोज सायंकाळी 6.30 वाजता होईल. या व्याख्यानमालेस उपस्थितीचे आवाहन मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ सोमनाथ ब्रह्मे, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारणी सदस्य प्रा.डॉ.पी.बी.भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा.डॉ.सुरेश माहेश्वरी, प्रा.श्याम पवार, प्रा.शीला पाटील, स्विकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.