जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२३ । धरणगाव तालुक्यात राहणाऱ्या १० वर्षीय चिमुकलीला पाणी भरण्याच्या बहाणा करून घरात बोलवून तिचे तोंड दाबून विनयभंग केल्याचा धकाकदायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधिताला अटक करण्यात आली आहे.

धरणगाव तालुक्यातील एका भागात १० वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २० मे रोजी दुपारी साडेतीन वर्षाच्या सुमारास गावात राहणारा कडू उर्फ देविदास मधुकर नन्नवरे याने पीडित मुलीला पाणी भरण्याचा बहाणा करून घरात बोलावले, तसेच तिचे तोंड दाबून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला.

हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीचे वडील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपीकडू उर्फ देविदास मधुकर नन्नवरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.







