⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

‘गिरणा गाैरव’ पुरस्काराने शंभू पाटील सन्मानित

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गिरणा गौरव’ पुरस्कार अत्यंत थाटात जल तज्ज्ञ राजेंद्रसिंह यांच्या हस्ते कवी कालिदास नाट्यगृहात ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमात अध्यक्षस्थानी रामदास फुटाणे, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग, पालकमंत्री छगन भुजबळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार आणि मान्यवर उपस्थित होते. नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार पाटील यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी कवी राजू देसले, कवी प्रकाश होळकर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यापूर्वी हापुरस्कार डॉ. भालचंद्र नेमाडे, सिंधुताई सपकाळ, भवरलाल जैन, डॉ मोहन आगाशे, अँड. उज्ज्वल निकम, रतनलाल. सी. बाफना, लेखक रंगनाथ पठारे आदी मान्यवरांना पुरस्कार मिळाला आहे. या कार्यक्रमात पालकमंत्री छगन भुजबळ, राजन गवस, गुरू ठाकूर, नीलिमा मिश्रा या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.