⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या ६ कर्मचार्‍यांना सातवा वेतन लागू

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्यापासून कायम कर्मचार्‍यांना ग्रामपंचायत वेतन श्रेणीऐवजी नगरपंचायतीच्या नियमानुसार वेतनश्रेणी लागू होण्याची प्रतीक्षा होती. शासन नियमानुसार मुक्ताईनगर नगरपंचायतच्या सहा कर्मचार्‍यांना 11 ऑक्टोबरपासून सातवा वेतन आयोगानुसार त्यांचे समावेश होऊन 21 दिवसांचे वेतन प्राप्त झाल्याने ऐन दिवाळीत या कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

याबाबत नगरपंचायतीच्या कार्यालयीन सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 39 कर्मचार्‍यांना नगरपंचायत अधिनियमानुसार वेतनश्रेणीत समाविष्ट करण्याची शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. त्यापैकी शिरीष सोपान कोळी, सुनील गणपत चौधरी, ज्ञानेश्वर काशिनाथ सोनार, संजीव निनू झांबरे, किशोर रमेश सैतवाल, संजय विश्वनाथ सोनार या सहा कर्मचार्‍यांचे सातव्या वेतन आयोगानुसार लिपिक-टंकलेखक वेतनश्रेणी एस सिक्स या पदावर समावेशन झाले आहे. या सहा कर्मचार्‍यांना 11 ऑक्टोबरपासून 21 दिवसांचे सातव्या आयोगानुसार वेतन मिळाल्याने त्यांची दिवाळी दरवर्षीपेक्षा अधिक गोड झाली आहे. उर्वरित अजून 33 कर्मचार्‍यांचे समावेश करण्याची शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. याबाबत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी पाठपुरावा केला होता. तर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक दीपक जग्रवाल, लिपीक मयूर महाजन यांनी कागदपत्रांची माहिती तयार करण्यासाठी परीश्रम घेतले.

रवींद्र मोरे, सचिन काठोके, संजय घुले, मालती माळी, किशोर महाजन, संजय हिवरकर, सुरेश अलोणे, भगवान गायकवाड, विजय वाघ, मनीष धामणे, दयाप्रसाद कटारीया, दीपक चनाल, संजय वंजारी, जयंत कपले, इलियास खान, गणेश कोळी, सिद्धार्थ खैरनार, राजू सपकाळे, निलेश डवले, नितीन तेजी या कर्मचार्‍यांचे जिल्हास्तरावर प्रस्ताव प्रस्तावीत आहे. तर विभागीय स्तरावर प्रस्ताव गेलेले कर्मचारी भगवान वंजारी, अनिल तायडे, किशोर बोदडे, गजानन सुरंगे, अकील खान, गोपाळ लोहेरे, रफिक शेख यांचा समावेश आहे. यासह प्रशिक्षण पूर्ण झालेले सहा कर्मचारी नितीन महाजन, गंभीर गुरचळ, अनिल इंगळे, विनोद फरदाडे, संदीप सुरवाडे, योगेश धनगर यांचे प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठवण्यात आलेले असून या 33 कर्मचार्‍यांचे नगरपंचायतीमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. पालिकेतील सेवाजेष्ठतेनुसार अंतिम जिल्हास्तरीय यादी नगरपंचायतीच्या फलकावर लावण्यात आली आहे.