जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच पाचोरा पासून जवळच असलेल्या पीजे रेल्वे गेटजवळ रात्री कार आणि एका खाजगी ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला. सुदैवाने दोन्ही वाहनांतील प्रवाशांना कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातानंतर कारचे इंजिन थेट रस्त्याच्या कडेला जाऊन पडले.

पाचोरा पासून जवळच असलेल्या पीजे रेल्वे गेटजवळ एमएच ४१ बीई २२९४ क्रमांकाची कार आणि खाजगी ट्रॅव्हल्समध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचे इंजिन रस्त्याच्या कडेला जाऊन पडले, तर ट्रॅव्हल्सच्या पुढील टायरचा स्फोट झाला

सुदैवाने दोन्ही वाहनांतील प्रवाशांना कोणतीही जीवितहानी झाली नाही. या भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात. त्यामुळे या ठिकाणच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.









