गुन्हेभुसावळ

खळबळजनक : भुसावळात निर्वस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळला, घातपात झाल्याचा संशय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधुबनजवळ 30 ते 35 वर्षीय वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या महिलेचा घातपाती मृत्यू झाल्याची चर्चा असून फॉरेन्सिक शवविच्छेदनानंतर महिलेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल मधूबनपासून काही अंतरावर असलेल्या जागेवर निर्वस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी, एलसीबीचे कर्मचारी तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांनी धाव घेतली. दरम्यान, मयत महिलेच्या अंगावर एकही कपडा आढळून न आल्याने महिलेचा घातपाती मृत्यू झाल्याचा दाट संशय आहे. पोलिसांनी मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी हलवला आहे. पीएम रीपोर्टनंतर महिलेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होताच पुढील तपासाला गती येणार आहे.

दरम्यान, महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा संशय असून फॉरेन्सिक पीएमनंतर अधिक काही सांगता येईल. मयताची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असून आठवड्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला असावा, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.

Related Articles

Back to top button