⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

चोपडा : टरबूजांनी भरलेला ट्रक झाला पलटी ; क्लिनर जागीच ठार, सहा मजूर जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२३ । शेतातून टरबूजांनी भरलेला ट्रक घेऊन निघालेल्या मजुरासोबत दु:खद घटना घडली. टरबूजने भरून चोपडाकडे येत असताना ट्रक मातीच्या रस्त्यावरून स्लिप होऊन पलटी झाला. यात ट्रकखाली दबला गेल्याने क्लिनरचा मृत्यू झाला आहे. साजीद मोहम्मद बागवान (३५, साने गुरुजीनगर, चोपडा) असं क्लिनरचं नाव असून या अपघातात इतर सहा मजूर गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेत ट्रकमधील टरबजूचंही मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे.

काय आहे घटना?
साजिद महमद बागवान हा अमजद खान तमीझ खान पठान यांच्या ट्रकवर (एमएच १८ बीए ३४८६) क्लिनर म्हणून काम करत होता. सोमवारी साजीद बागवान हा चोपडा तालुक्यातील वराड शिवारात टरबूज भरण्यासाठी ट्रकचालकासोबत गेला होता. गाडी टरबूजने भरून चोपडाकडे येत असताना ट्रक मातीच्या रस्त्यावरून स्लिप होऊन उलटला. या अपघातात क्लिनर साजीद बागवान हा ट्रकच्या केबीनखाली दबला गेल्याने जागीच ठार झाला. तर या अपघातात ट्रकमध्ये बसलेले सहा मजूर जखमी झाले.

जखमींचे नाव
किरण मोरे (१७), लताबाई सोनवणे (३४), प्रवीण भिल्ल (२०), गणेश भिल्ल (१६), लताबाई भिल्ल (४०, रामपुरा, चोपडा), शफी फारूक बागवान (३४, केजीएन कॉलनी, चोपडा) या मजुरांचा समावेश आहे. जखमींवर चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रकला बाजूला करुन केबिनच्या खाली दबलेल्या साजीद बागवान याला बाहेर काढलं. मात्र त्याचा मृत्यू झाला होता.

या अपघातात ट्रक क्लिनरचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. शेतातून टरबूजांनी भरलेला ट्रक घेऊन निघालेल्या मजुरासोबत दु:खद घटना घडली. यात शेतातील शेतमाल, टरबूजांचं मोठं नुकसान झालं आहे. अख्खा ट्रक पलटी झाल्याने सर्व टरबूज रस्त्यावर पसरले असून शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.