---Advertisement---
एरंडोल

आत्मदहन रोखले : उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील उत्राण अ.ह. येथील सरपंच शारदा भागवत पाटील यांनी अवैद्य वाळू उपसा रोखण्याकामी आपल्या परिवारासह सामूहिक आत्मदहन करण्याविषयी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले होते. त्यानुसार दि. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.०० वा. शारदा पाटील व त्यांचे कुटुंबीय तसेच उत्राण, भातखेडे, हनुमंतखेडे,ताडे,निपाणे, अंतुर्ली,जवखेडे येथील अनेक ग्रामस्थ त्यांच्या सोबत कार्यालयात आले. माजी आमदार व पालकमंत्री डॉ. सतीश अण्णा पाटील हेसुद्धा त्यांच्यासोबत होते. दरम्यान, उपविभागीय अधिकाऱ्यांनी अवैद्य वाळू उपसा रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, प्रादेशिक परिवहन मंडळाचे अधिकारी यांना सोबत घेऊन अवैद्य वाळू उपसा रोखू व त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठवू असे लेखी आश्वासन दिले.

jalgaon 2022 10 17T160255.013

तहसील आवारात उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्यासोबत चर्चा करत असताना अचानक शारदा पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी सोबत असलेले उत्राण येथील भिकन रमेश कोळी यांनी आपल्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळेस उपस्थित एरंडोल व कासोदा पोलीस स्टेशनचे पोलीस व महिला पोलीस यांनी त्यांना आत्मदहनास रोखून ताब्यात घेतले. डॉ. सतीश पाटील व उपविभागीय अधिकारी एरंडोल यांनी त्यांना आत्मदहनास परावृत्त करून त्यांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान, उपविभागीय अधिकाऱ्यांनी अवैद्य वाळू उपसा रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, प्रादेशिक परिवहन मंडळाचे अधिकारी यांना सोबत घेऊन अवैद्य वाळू उपसा रोखू व त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठवू असे लेखी आश्वासन दिले. त्यावेळी उपस्थित माजी आमदार सतीश पाटील यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आश्वासन दिले. डॉ. सतीश पाटील यांनी बोलताना मी सुद्धा वाळू उपसा रोखण्यासाठी उपोषण केले होते.

---Advertisement---

अवैद्य वाळू वाहतूक करताना डंपर व ट्रॅक्टर पकडून कासोदा पोलीस स्टेशनला जमा केले होते. त्यानंतर काही दिवस हे प्रकार थांबले व नंतर परत सुरु झाले यापुढे असं होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती उपविभागीय अधिकारी यांना केली. याप्रसंगी डॉ. हर्षल माने यांनी सुद्धा तहसील आवारात शारदा पाटील व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सोबत हनुमंतखेडे सिम चे सरपंच विनोद पाटील,उत्राण गु.ह. सरपंच चंद्रकांत वाघ, कोळी महासंघाचे अध्यक्ष भिकन कोळी, कैलास कोळी, रा.काँ.चे संदीप वाघ, दत्तु पाटील, गणेश कोळी, भैय्या महाले , लताबाई कोळी व जवळपास सोबत ३०० ते ४०० पुरुष व महिला तहसील कार्यालयात उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---