जळगाव लाईव्ह न्युज | ११ मे २०२२ | आंतराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने ( खेलो इंडिया एक्सलन्स सेंटर) राज्य निपुणता केंद्रांअतर्गत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळंगे- बालेवाडी, पुणे येथे शुर्टींग, सायकलिंग व ॲथलॅटिक्स या तीन खेळाकरिता राज्य निपुणता केंद्र कार्यन्वित करण्यात आलेले आहे. राज्य निपुणता केद्राअतर्गत शुर्टिग – 24, सायकलिंग – 14 व ॲथलॅटिक्स-18 या संख्येनुसार खेळाडुंची निवड करण्यात येणार आहे. सदर खेळांच्या निवड चाचणीसाठी शुर्टिंग, सायकलिंग व ॲथलॅटिक्स या खेळातील राज्यस्तरावर प्राविण्यप्राप्त किंवा राष्ट्रीयस्तरावर सहभाग / प्राविण्य प्राप्त खेळाडु पात्र असतील, सदर निवड चाचण्या दिनांक 30 ते 31 मे, 2022 या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे येथे घेण्यात येणार आहे.
सदर निवड चाचण्याकरिता खेळाडुंनी जातांना राज्य, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रमाणपत्रांची व शैक्षणिक कागदपत्रांची छायांकीत प्रतसह मुळ प्रत तसेच जन्म तारखेची नोंद असलेल्या जनरल रजिष्टरची छायांकित प्रत सोबत घेवुन जाणे आवश्यक आहे. सदर चाचण्याचे विहित नमुन्यतील अर्ज [email protected] या ई-मेल वर दिनांक 23 मे, 2022 पर्यंत पाठवावे. सदर निवड चाचण्यासाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुगे- बालेवाडी, पुणे येथे आवश्यकतेनुसार फक्त खेळाडुंची निवासाची व्यवस्था करण्यात येणार असुन, प्रवास व भोजन खर्च स्वखर्चाने करावयाचा आहे.
तरी जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा / संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शाळा, विविध क्रीडा संघटना व क्रीडा मंडळे यांनी राज्यस्तरावर शुटिंग, सायकलिंग व ॲथलॅटिक्स या खेळाच्या निवड चाचण्यांकरिता इच्छुक सहभागी मुलांमुली खेळाडुंना विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी श्री. मिनल थोरात राज्य क्रीडा मार्गदर्शक 8625946709 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित, यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.