शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा

एप्रिल 28, 2022 12:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । मुंबई येथे दि ७ मे रोजी होणाऱ्या मुंबई क्लासिक २०२२ या शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड चाचणी ४ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता राधाकृष्णनगरातील श्रीसाई बजरंग जिम येथे आयोजित करण्या आली आहे.

बॉडी

दिना बामा पाटील प्रतिष्ठान व माजी खासदार संजय दिना पाटील यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे. भांडूप येथील लाला शेठ कंपाऊंड, ९० फुटी रोड, अशोक केदारे चौक येथे या स्पर्धा होणार आहेत. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांकाच्या स्पर्धकांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे जिल्हा बॉडीबिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहन चव्हाण, जयेश चौधरी, अक्षय चव्हाण, संघटन सचिव राजेश बिऱ्हाडे यांनी कळवले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now