MPSC संयुक्त पूर्व परीक्षा: जळगावात परीक्षा केंद्रांच्या परिसरात कलम १६३ लागू!

जून 10, 2026 3:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) रविवार, १४ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र गट “ब” (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६’ च्या पार्श्वभूमीवर जळगाव प्रशासन सतर्क झाले आहे. परीक्षा काळात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जळगाव शहरात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

examinations for medical

जळगाव शहरात या परीक्षेसाठी 32 परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होण्याची तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

दि. 14 जून 2026 रोजी परीक्षा सुरू झाल्यापासून परीक्षा संपेपर्यंत सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात कोणालाही प्रवेश करता येणार नाही. मात्र, परीक्षार्थी, नियुक्त अधिकारी-कर्मचारी, पोलीस व होमगार्ड यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

तसेच सर्व परीक्षा उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तरी सर्व संबंधितांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now