⁠ 
रविवार, मे 19, 2024

महाविकास आघाडीचं जागावाटप फायनल ; जळगाव, रावेरची जागा कोणाच्या वाट्याला?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 31 जानेवारी 2024 | महाविकास आघाडीची आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत बैठक पार पडली असून यात बैठकीत राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवर अंतिम निर्णय झाला असल्याचं सांगण्यात येत असून कोणाला कोणता मतदारसंघ हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र अजूनही 8 जागांवरून तिढा कायम आहे. दरम्यान, या निर्णयानुसार जळगाव आणि रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यावर आली आहे.

मुंबईतील नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रण देण्यात आलं. त्यानुसार वंचितचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते. यावेळी लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवर अंतिम निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर उर्वरित 8 जागांचा तिढा अद्याप कायम आहे.

या जागांमध्ये रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी यांचा समावेश आहे जिथे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस दावा करत आहेत. याशिवाय काँग्रेस पक्ष मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ आणि मुंबई उत्तर पश्चिमच्या जागा मागत आहे. मात्र 2019 मध्ये दोन्ही जागांवर शिवसेना विजयी झाली होती. उद्धव ठाकरे गट दोन्ही जागा सोडण्यास तयार नाही.

2 फेब्रुवारीला होणाऱ्या पुढील बैठकीत हा तिढा सुटला नाही, तर हा मुद्दा तिन्ही पक्षाच्या नेतृत्वासमोर मांडला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.दरम्यान, वंचितसाठी अकोला लोकसभा मतदारसंघाची जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मविआमध्ये या एकाच जागेवर समाधानी राहणार की आणखी जागांची मागणी करणार हे पाहावं लागेल. वंचित बहुजन आघाडीकडून अधिक जागांची मागणी झाल्यास हा तिढा आणखी वाढू शकतो.

कोणत्या पक्षाला किती जागा?
काँग्रेस – 14
ठाकरे गट – 17 (15 + 2) (यामध्ये वंचित 1 आणि स्वाभिमानीला 1 जागा)
राष्ट्रवादी काँग्रेस -9
तिढा असलेल्या जागा – 8

कोणत्या मतदारसंघाची जागा कोण लढवणार?
१) रामटेक -तिढा कायम
२ ) बुलढाणा – शिवसेना ठाकरे गट
३) यवतमाळ वाशीम -शिवसेना ठाकरे गट
४) हिंगोली – तिढा कायम
५) परभणी -शिवसेना ठाकरे गट
६) जालना -तिढा कायम
७) संभाजीनगर -शिवसेना ठाकरे गट
८) नाशिक -शिवसेना ठाकरे गट
९) पालघर -शिवसेना ठाकरे गट
१०) कल्याण – शिवसेना ठाकरे गट
११) ठाणे – शिवसेना ठाकरे गट
१२) मुंबई उत्तर पश्चिम -तिढा कायम
१३) मुंबई दक्षिण -शिवसेना ठाकरे गट
१४) मुंबई ईशान्य -शिवसेना ठाकरे गट
१५) मुंबई दक्षिण मध्य – तिढा कायम
१६) रायगड -शिवसेना ठाकरे गट
१७)रत्नागिरी सिंधुदुर्ग – शिवसना ठाकरे गट
१८) मावळ -शिवसेना ठाकरे गट
१९) शिर्डी – तिढा कायम
२०) धाराशिव -शिवसेना ठाकरे गट
२१) कोल्हापूर – शिवसेना ठाकरे गट
२२) हातकणंगले – ( स्वाभिमानी शेतकरी संघटनासाठी सोडू शकतात)
२३) अकोला – (वंचित बहुजन आघाडी साठी सोडणार)
२४) शिरूर – राष्ट्रवादी
२५) सातारा -राष्ट्रवादी
२६) माढा- राष्ट्रवादी
२७) बारामती -राष्ट्रवादी
२८) जळगाव -राष्ट्रवादी
२९) रावेर -राष्ट्रवादी
३०)दिंडोरी -राष्ट्रवादी
३१) बीड -राष्ट्रवादी
३२) अहमदनगर -राष्ट्रवादी
३३) अमरावती -काँग्रेस
३४) भंडारा – काँग्रेस
३५) चंद्रपूर -काँग्रेस
३६) गडचिरोली – काँग्रेस
३७) नांदेड -काँग्रेस
३८) लातूर -काँग्रेस
३९) धुळे -काँग्रेस
४०) नंदुरबार -काँग्रेस
४१) पुणे -काँग्रेस
४२) सोलापूर – काँग्रेस
४३) सांगली -काँग्रेस
४४) मुंबई उत्तर मध्य- काँग्रेस
४५) मुंबई उत्तर -काँग्रेस
४६) भिवंडी -तिढा कायम
४७) वर्धा- तिढा कायम
४८) नागपूर -काँग्रेस