स्वस्त धान्य वाटपात मोठा घोळ केलेची तक्रार चिचखेडा त. वा. येथील ग्रामस्थांनी तहसिलदारांकडे केली होती. तहसिलदारांनी या तक्रारीची दाखल घेत संबधित स्वस्त धान्य दुकानदारावर सीलची कारवाई केली आहे.
संबधित स्वस्त धान्य दुकानदाराचा दुकान चालक परवाना रद्द करुन अपहार प्रकरणी कायदेशीर कारवाईची हिवरखेडा (त. वा) येथील ग्रामस्थांची तहसिलदार यांचेकडे मागणी केली आहे. हिवरखेडा (त.वा.) स्वस्त धान्य दुकान चालक सौ. एस. एस. औटी, (रा.वाकडी) ह्यांच्या स्वस्त धान्य वाटपाबाबत हिवरखेडा (त. वा.)ग्रामस्थांनी तहसीलदार जामनेर यांचेकडे तक्रार वारंवार अर्ज केल्यानंतर अधिकारी यांचेकडुन अखेर तक्राराची दखल घेण्यात आली.
स्वस्त धान्य दुकान परवानाधारक, सौ.औटी ह्या कार्डधारकांना युनिट पेक्षा कमी धान्य वाटप करणे, लाभार्थ्यांशी अरेरावी करणे ,धान्य वाटपात अनियमितता, रेशन कार्ड वर नोंदी न करणे, शासकीय दरापेक्षा अधिकचा दर आकारणे दुकानावर धान्य साठ्याबाबतचा दर्शनी फलक न लावणे अशा स्वरूपाच्या तक्रारी हिवरखेडा (त.वा.)गांवातील ग्रामस्थानी तहसील कार्यालयाकडे केल्या होत्या.ग्रामस्थांनी सतत अर्ज केल्यानंतरही कारवाई सखोल अशी कारवाई होत नव्हती. अखेर दिनांक, ५ मे २०२१रोजी संबधित अर्जाची तात्काळ दखल घेत जामनेर तहसिलचे पुरवठा अधिकारी काकडे यांनी हिवरखेडा (त. वा.) येथील स्वस्त धान्य दुकानास सील लावले. या कारवाई वेळी तलाठी सोनवने, पोलीस पाटील, पांडुरंग अहिरे ,सरपंच, उपसरपंच, कोतवाल शेजोळे व तक्रारदार ग्रामस्थ हजर होते.