---Advertisement---
जळगाव शहर शैक्षणिक

शाळकरी विद्यार्थी मांडणार त्यांच्या मनातील ‘जळगावची छबी’

---Advertisement---

फिस्ट फाऊंडेशन व इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेन राबविणार निबंध स्पर्धा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२२ । जळगाव शहर, स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित शहर असे ब्रीद वाक्य असलेली जळगाव शहर महानगरपालिका. जळगाव शहराचा विकास रखडला, रस्ते खड्ड्यात हरवले, वृक्षतोड वाढली, कचऱ्याचे ढीग दिसू लागले हे सर्व असताना देखील जळगावचा विकास होईल आणि एक स्वप्नातील जळगाव सत्यात उतरेल अशी आशा लावून जळगाव शहरवासी बसले आहेत. शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या फिस्ट फाऊंडेशन व इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे जळगाव शहरात शालेय स्तरावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

fist foundation essay jpg webp

जळगाव शहरातील फिस्ट फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे जळगाव शहरातील मराठी, इंग्रजी माध्यमातील शाळेत इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२१ जुलै ते ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत स्पर्धेचा कालावधी असून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी जळगाव : स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित शहर जळगाव तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी My Dream City Jalgaon असा विषय निश्चित करण्यात आला आहे. निबंध लेखन करताना सुंदर हस्ताक्षरात आपल्या शाळेत जमा करावयाचा असून निबंध A4 कागदावर लिहून वर स्वतःचे नाव, पत्ता, वर्ग, संपर्क क्रमांक, स्पर्धेचा विषय स्पष्टपणे लिहिणे आवश्यक आहे.

---Advertisement---

निबंध लेखनात चांगले प्रशस्त रस्ते, हिरवेगार शहर, मनोरंजन, क्रीडा मैदाने, स्वच्छता, साफसफाई, आरोग्य, शिक्षण व्यवस्था हे मुद्दे समाविष्ट करणे आवश्यक आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना ट्रॉफी, सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र, सहभागी शाळा प्रशासनाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. निबंध स्पर्धेसाठी जळगाव शहरातील विविध शाळा प्रशासनाशी संपर्क करण्यात येत असून त्याव्यतिरिक्त कुणाला स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्यास फिस्ट फाऊंडेशनचे सदस्य चेतन वाणी – 9823333119, सकीना लेहरी – 9423913968, कल्पक सांखला – 8055807393, इशिता दोशी – 9325399997, नेहा संघवी – 9028811127 यांच्याशी, लभोनी संकुल, नूतन मराठा महाविद्यालय जवळ, प्रशांत पब्लीकेशनसमोर याठिकाणी किंवा fistfoundation5@gmail.com यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---