---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

जलाराम नगरातील शालेय विद्यार्थी बेपत्ता

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । शहरातील सावखेडा शिवारात असलेल्या जलाराम नगरातील १४ वर्षीय विद्यार्थी गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता झाला असून त्याला कुणीतरी पळवून नेले असावे असा अंदाज पालकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

missing boy jpg webp

सावखेडा शिवारात असलेल्या जलाराम नगरात विलास नामदेव पाटील हे राहतात. दि.१६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा पुरुषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील वय-१४ वर्ष याला मित्राचा फोन आल्याने तो त्याच्याकडे जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला. कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने दि.१८ रोजी याप्रकरणी तालुका पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

---Advertisement---

विलास पाटील यांनी फिर्याद नोंदविली असून मुलाला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे. बेपत्ता विद्यार्थी कुठेही आढळून आल्यास तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

हे देखील वाचा :

    Join WhatsApp Channel

    Join Now

    google-newsFollow on Google News

    Join Now

    ---Advertisement---