---Advertisement---
नोकरी संधी

नोकरीची सुवर्णसंधी….SBI स्टेट बँकेत 2056 जागांवर बंपर भरती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकरी गेल्या तर अनेक जण बेरोजगार झाले आहे. दरम्यान, अशात बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. स्टेट बँकेत याद्वारे 2056 जागांवर भरती केली जाणार आहे.

SBI PO Recruitment 2021 2 jpg webp

या पदासाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 5 ऑक्टोबर 2021 पासून सुरु होत आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदावारांनी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेले नोटिफिकेशन वाचून घेणं आवश्यक आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी 4 ऑक्टोबर 2021 रोजी नोटिफिकेशन जारी केलं आहे.

---Advertisement---

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर

पात्रता
भारतीय स्टेट बँकेतील प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंत कोणत्याही शाखेत पदवी असणे आवश्यक आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरील नोटिफिकेशन वाचून उमेदवार अर्ज सादर करु शकतात.

वयोमर्यादा :
उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांपेक्षा कमी असावे. भारतीय स्टेट बँकेच्या नियमांनुसार आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा अट शिथील केलेली असेल.

इतका मिळेल पगार :

निवडलेल्या उमेदवारांना चार आगाऊ वेतनवाढीसह 27,620 रुपयांच्या मूळ वेतनावर नियुक्त केले जाईल. निवडलेल्या उमेदवारांचे वेतन 23,700 ते 42,020 रुपयांच्या कंसात असेल. उमेदवार डीए, एचआरडी, सीसीए आणि इतर भत्ते मिळण्यास पात्र असतील. निवड झालेल्या उमेदवारांना सामील होताना 2 लाख रुपयांच्या बॉण्डवर स्वाक्षरी करावी लागेल. बाँडनुसार, उमेदवारांना किमान तीन वर्षांच्या कालावधीसाठी बँकेत सेवा द्यावी लागेल.

अर्ज कसा दाखल करायचा?
स्टेप 1 : सर्वप्रथम स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर भेट द्या
स्टेप 2 : वेबसाईटवरील होमपेजवरील current openings लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : आता RECRUITMENT OF PROBATIONARY OFFICERS ADVERTISEMENT NO: CRPD/PO/2021-22/18 च्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 4 : नवीन नोंदणीसाठी क्लिक करा.
स्टेप 5 : वैयक्तिक माहिती सादर करा अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अर्जाची प्रिंट घ्या.

अधिकृत अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा

 

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---