SBI Bharti : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पदवी पाससाठी सुवर्णसंधी; तब्बल 600 जागांसाठी भरती
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही सरकारी बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. विशेष या भरती प्रक्रियेला सुरुवात झालीय. पदवी पास असलेल्या उमेदवारांना ही मोठी संधी असणार आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 600 रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे. प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२४ आहे. या नोकरीसाठी तुम्ही sbi.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी.
वयाची अट :
21 ते 30 वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे; उदाहरणार्थ, SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, OBC (नॉन-क्रीमी लेयर) उमेदवारांना 3 वर्षे आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना विशिष्ट वर्गानुसार अधिक सूट दिली जाते.
निवड प्रक्रिया
स्टेट बँकेतील प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी निवड परीक्षेद्वारे होणार आहे. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होणार आहे: प्रिलिम्स परीक्षा, मेन्स परीक्षा आणि मुलाखत व ग्रुप एक्सरसाइज. प्रिलिम्स परीक्षा मार्च महिन्यात, मेन्स परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यात, आणि मुलाखत मे किंवा जून महिन्यात होणार आहे.
रिक्त जागा आणि अर्ज शुल्क
स्टेट बँकेत 600 रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे, ज्यात 586 रेगुलर पदे आणि 14 बॅकलॉग पदे समाविष्ट आहेत. अर्ज करताना सामान्य वर्गाच्या उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा