वाणिज्य

SBI च्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी ; बातमी ऐकून ग्राहकांना फुटला घाम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२२ । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी आहे. आता SBI कडून कर्ज घेणे महाग होणार आहे आणि नवीन आणि जुन्या ग्राहकांचा EMI देखील वाढणार आहे. वास्तविक, SBI ने आपल्या कर्ज दराची सीमांत किंमत (SBI MCLR Hike) वाढवली आहे. नवीन दर १५ ऑगस्टपासून लागू झाले आहेत. याआधी जून आणि जुलैमध्येही SBI ने MCLR वाढवला होता.

SBI ने दिला मोठा धक्का
महत्त्वाची बाब म्हणजे, स्टेट बँक ऑफ इंडियाने आजपासून म्हणजेच १५ ऑगस्टपासून कर्जावरील निधीचा मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लेंडिंग रेट (MCLR) वाढवला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे ज्या कर्जदारांचे कर्ज MCLR शी जोडलेले आहे त्यांच्या EMI मध्ये वाढ होईल. या महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. या वाढीपासून बँकांनी विविध कर्जदरात वाढ केली आहे. एसबीआयने गेल्या आठवड्यातच मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती. गेल्या महिन्यात देखील स्टेट बँक ऑफ इंडियाने MCLR 10 बेसिस पॉईंटने वाढवला होता.

नवीन दर जाणून घ्या
लाइव्ह मिंटच्या अहवालानुसार, या दरवाढीअंतर्गत, बँकेने आता एका रात्रीतून तीन महिन्यांपर्यंतच्या कर्जासाठीचा MCLR दर 7.15 टक्क्यांवरून 7.35 टक्के केला आहे.
याअंतर्गत सहा महिन्यांच्या कर्जाचा MCLR दरही 7.45 टक्क्यांवरून 7.65 टक्के करण्यात आला आहे.
एक वर्षाचा दर 7.5 टक्क्यांवरून 7.7 टक्के करण्यात आला आहे.
त्याच वेळी, 2 वर्षांचा MCLR दर 7.7 टक्क्यांवरून 7.9 टक्के करण्यात आला आहे.
तीन वर्षांचा MCLR दर 7.8 टक्क्यांवरून 8 टक्के करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button