गुन्हेयावल

हृदयद्रावक : ६ वर्षीय चिमुरड्याचा गळा आवळून पित्याची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२१ । फैजपूर शहरातून एक हृददायक घटना समोर आली आहे. अवघ्या ६ वर्षीय चिमुरड्याचा गळा आवळून पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना आज शुक्रवारी दुपारी फैजपूर शहरातील बसस्थानाच्या मागे असलेल्या मिरची ग्राऊंड परिसरात घडली. आर्यन निलेश बखाल (6) असे खून झालेल्या मुलाचे तर निलेश घनश्याम बखाल (35, मूळ रा.विवरे, ता.रावेर, ह.मु. बसस्थानकच्या मागे मिरची ग्राऊंड, फैजपूर) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली? याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

faizpur crime 1 jpg webp

याबाबत असे की, फैजपूर बसस्थानकच्या मागे मिरची ग्राऊंड येथील निलेश घनश्याम बखाल हे आपल्या पत्नी व सहा वर्षाचा मुलगा आर्यन सोबत वास्तव्याला आहे. ते शहरातील बापू डेअरीचे संचालक आहेत. दरम्यान आज सकाळी पत्नीला बाजार व किराणा आणण्यासाठी बाजारात सोडले. त्यानंतर ते घरी गेले. दरम्यान ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला. निलेश बखाल यांनी त्यांचा सहा वर्षाचा मुलगा आर्यन याचा गळा दाबून खून केला आणि स्वत: दोरी गळफास घेवून आत्महत्या केली.

त्यांची पत्नी घरी आल्यावर घराचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. दरवाजा ठोठावून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजारचांच्या मदतीने दरवाजा उघडला असता दोघांचे मृतदेह आढळून आल्याने पत्नीचा जबर धक्का बसला आहे. या घटनेमुळे फैजपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तातडीने दोघांना यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी मयत घोषीत केले. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button