जळगाव जिल्हा
सावदा येथे राज्यपालांच्या वक्तव्याचे राष्ट्रवादीतर्फे निषेध
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२२ । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच औरंगाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराजा बद्दल तसेच महाराष्ट्रातील महापुरुषा बद्दल काढलेल्या अवमानकारक विधानाचा सावदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध व्यक्त करत येथील पोलीसांत निवेदन देण्यात आले.
यावेळी नगरसेवक राजेश वानखेडे, अजय भारंबे, नंदाबाई लोखंडे, बाजार समिती सदस्य पंकज येवले, रॉ. का. शहराध्यक्ष कुशल जावळे, युवक शहराध्यक्ष गौरव वानखेडे, रॉ. का. विद्यार्थी तालुका अध्यक्ष साईराज वानखेडे, राजेश कोल्हे, दीपक पाटील, डी. के. पाटील, तेजस वंजारी यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.